
नांदेड ः केंद्र शासनाच्या युवा व खेळ मंत्रालय अंतर्गत नांदेड जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने १ ते ३० एप्रिल दरम्यान नांदेड शहरातील अशोक नगर येथे मास्टर तायक्वांदो मार्शल आर्ट स्कूल येथे एका महिन्याचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महिनाभर चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिराचा नांदेड मधील विद्यार्थी, युवक व युवतीने लाभ घेण्याचे आव्हान संघटनेतर्फे करण्यात आले आहे. ऑलिम्पिक मध्ये खेळला जाणारा तसेच जगभरातील सर्व संरक्षण दलासह भारतात सर्व विभागात नोकरी आरक्षणात असणारा सर्वोत्तम संरक्षण खेळ प्रकार तायक्वांदोचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या माध्यमातून विविध चार बॅचेसमध्ये देण्यात येणार आहे.
स्वसंरक्षणासह शालेय, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत तसेच सीबीएससी स्पर्धेत, ऑलिम्पिक ट्रायल स्पर्धेत, खेलो इंडिया स्पर्धेसह तायक्वांदो पोलिस स्पर्धा, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवत नोकरीचे पाच टक्के आरक्षणासह महाराष्ट्र शासनातर्फे इतरही सुविधांचा लाभ खेळाडूंपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक बालाजी पाटील जोगदंड यांनी केले आहे.
प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असून उत्कृष्ट विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी या शिबिरातून निवडण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नांदेडकरांनी अशोक नगर नांदेड येथे तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 9420673394 या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.