
सोलापूर ः मराठा प्रीमियर लीग स्पर्धेच्या साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकून शिवनेरी (विक्रांत वानकर) संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवनेरी संघाच्या सौरभ जाधव याने पहिले अर्धशतक लगावले. नितीन गायकवाडने ३ सामन्यात ५ व राहुल सुरवसेने एकूण ६ बळी घेतले.
येथील विजापूर रोडवरील नेहरूनगर शासकीय मैदानावर मराठा प्रीमियर लीग सीझन २ चे दिमाखदार उद्घाटन पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महेश गादेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन करण्यात आले.
यावेळी विजापूर नाका पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक दादाराव गायकवाड, बिल्डर संघटनेचे दत्ता मुळे, राम साठे, विजय कोकाटे, रणजीत चवरे, सचिन चवरे, नामदेव पवार, रवी भोपळे, सुनील चव्हाण, चंद्रकांत पवार, सुनील जाधव, कुबेर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा आयोजक प्रशांत बाबर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पुष्पहार घालून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा स्फुरण देणाऱ्या घोषणा देऊन शिववंदन करण्यात आले. स्पर्धा समिती सदस्य सागर गव्हाणे, आमोघ जगताप, राजा जाधव, शंकर पवार आदी उपस्थित होते.
शुभारंभाचा सामना सिंहगड विरुद्ध शिवनेरी संघात मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक झाल्यावर खेळविण्यात आला आणि त्यात शिवनेरी संघाने दमदार विजय मिळवला. स्पर्धा शुभारंभाच्या पहिल्या दिवशी एकूण ६ सामने खेळविण्यात आले असून शहरी भागातील अ गटातील ४ संघ साखळी पद्धतीने प्रत्येकी ६ षटकांचे हे सामने पार पडले. स्पर्धेत प्रत्येक सामन्यात ॲड गौरव जाधव यांच्याकडून सामनावीर पुरस्कार आणि सन्मानचिन्ह नमेंद्र साखरे व बालाजी जाधव यांच्याकडून असून स्पर्धेत पहिले पारितोषिक १ लाख ३९५ आणि विजयराव मुळीक यांच्या स्मरणार्थ चषक देण्यात येणार असून चषक विक्रांत पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत. या स्पर्धेस सोलापूर जिल्हा क्रिकेट अंपायर्स असोसिएशनचे पंच यांचे सहकार्य लाभत आहे.
संक्षिप्त धावफलक
१) सिंहगड : तीन बाद ९० (बालाजी शिंदे ३५, दीपक भोसले १८, सचिन लोंढे नाबाद १३, निरंजन कदम व मनोज पवार एकेक बळी) पराभूत विरुद्ध शिवनेरी : तीन बाद ९१ (निरंजन कदम नाबाद ३७, किरण पवार ३०, धनंजय २ बळी, नरेंद्र साखरे १ बळी).
२) पन्हाळगड : सहा बाद ६९ (नितीन काशीद २८, गणेश चव्हाण १२, एस के १३
सनी पोळ ३-१५, धनंजय जाधव २ बळी) विजयी विरुद्ध तोरणा : नऊ बाद ३३ (अक्षय भोसले ३-१, संदीप मगर, राहुल सुरवसे, गुंड प्रत्येकी २ बळी).
३) पन्हाळगड : सात बाद ४३ (गणेश चव्हाण २०, रामा भिंगारे १०, नितीन गायकवाड व मनोज पवार प्रत्येकी २ बळी, सौरभ जाधव १ बळी) पराभूत विरुद्ध
शिवनेरी : एक बाद ४५ (सौरभ जाधव नाबाद ३२, राम लखन नवगिरे ११, अक्षय भोसले १ बळी).
४) तोरणा : पाच बाद ६१ (महेंद्र धवन नाबाद ३६, विजय पवार, धनंजय, आशिष जाधव प्रत्येकी १ बळी) पराभूत विरुद्ध सिंहगड : दोन बाद ६१ (बालाजी शिंदे नाबाद ४४, दीपक भोसले ११, सनी पोळ, विशाल पोपळे प्रत्येकी १ बळी).
५) सिंहगड : सात बाद ३९ (बालाजी शिंदे १३, संदीप मगर ३-१०, राहुल सुरवसे २-१७, अक्षय भोसले १ बळी) पराभूत विरुद्ध पन्हाळगड : एक बाद ४३ (राकेश नवले नाबाद १९, नितीन काशीद नाबाद १३, विजय पवार १ बळी).
उपांत्यपूर्व सामना
शिवनेरी : सहा बाद ८६ (सौरभ जाधव ५५, सचिन चव्हाण १४, राहुल सुरवसे, गणेश चव्हाण प्रत्येकी २ बळी) विजयी विरुद्ध पन्हाळगड : सहा बाद ८२ (गणेश चव्हाण १७, विकास सावंत नाबाद १६, राकेश नवले १५, नितीन गायकवाड ३ बळी, निरंजन कदम व सौरभ जाधव प्रत्येकी १ बळी).