
नागपूर : खेलो इंडिया युनिव्हर्सिटी हँडबॉल ट्रेनिंग सेंटर, आरटीएमएनयूचा सुरज रमेश शिंगाडे याची बिहारमधील जहानाबाद येथे सुरू असलेल्या ४६ व्या ज्युनियर नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
सूरज शिंगाडे हा प्रिया विद्या विहार, दुर्गा नगर, हिंगणा रोड येथील विद्यार्थी आहे आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी हँडबॉल ट्रेनिंग सेंटरचा प्रशिक्षणार्थी आहे. सुरज नियमितपणे आरटीएमएनयू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, रवी नगर, अमरावती रोड, नागपूर येथे प्रशिक्षक राकेश बनसोड आणि विनय पडोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ विशाखा जोशी, हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस रणधीर सिंग, डॉ नितीन जंगीटवार, डॉ आय एस रंधवा, डॉ आश्लेषा लंगोले, डॉ धीरज भोसकर, डॉ निशांत तिपटे, जावेद रहमान, श्रीमान सुरवन्न, श्रीयुत शर्मा, डॉ चौहान, रामप्रसाद राठोड, वैभव पंद्रे, सुनील गोरे, मुस्तकीम शेख यांनी सुरजचे अभिनंदन केले आहे.