
वेलिंग्टन ः आम्ही मालिका गमावली, काही फरक पडत नाही असे विधान पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आगा याने केले आहे. न्यूझीलंड संघाने पाच टी २० सामन्यांची मालिका ४-१ अशा मोठ्या फरकाने जिंकली. या मोठ्या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या कर्णधाराचे विधान आश्चर्यचकीत करणारे आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाला ८ विकेट्सनी दारुण पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडमध्ये ४-१ अशी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आगा यांनी एक विचित्र विधान केले. तो म्हणाला की आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही मालिका गमावली, काही फरक पडत नाही.
सामन्यानंतर कर्णधार सलमान म्हणाला, ‘त्यांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी संपूर्ण मालिकेत आम्हाला पूर्णपणे मागे टाकले. तथापि, आमच्यासाठी काही सकारात्मक गोष्टी देखील होत्या. ऑकलंडमध्ये हसन आणि हरिसने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि सुफियानने गोलंदाजी केली ते कौतुकास्पद होते. जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आमचे लक्ष आशिया कप आणि विश्वचषकावर होते.
पाकिस्तानी कर्णधार सलमान पुढे म्हणाला, ‘मी चांगली कामगिरी केली, पण जेव्हा तुम्ही मालिका गमावता तेव्हा त्याचा काही अर्थ राहत नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये पूर्णपणे वेगळा संघ असेल, ज्यांच्याकडे अधिक अनुभव असेल. आमचे बरेच खेळाडू यापूर्वी न्यूझीलंडमध्ये खेळले आहेत, त्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारचा सामना असेल.