
छत्रपती संभाजीनगर ः औताडे पाटील स्मार्ट सिटीमध्ये छत्रपती संभाजीराजे इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी गजानन राघुडे, कारभारी सोळुंके, संजय आळंजकर, साजापूर सरपंज देविदास गावंदे, एसएसईबीचे जाधव, जनार्दन नवसरे, मुळे कोचिंग क्लासेसचे विष्णू मुळे, बीएसएफ चेअरमन कैलास जाधव, उद्योजक कैलास भोकरे, रामकिसन शेळके, रवी काकडे, सुनील पालवे, पंढरीनाथ झिंजुर्डे, चाटे, स्वाती देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष औताडे, उपाध्यक्ष वैभव औताडे, मुख्याध्यापक माणिक राठोड यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे सुनील पालवे यांनी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना भविष्यातील विद्यार्थी कसा घडवावा व कसा घडला जाईल याबद्दल मार्गदर्शन केले. उद्योजक कैलास भोकरे यांनी एक कुशल विद्यार्थी कसा घडतो याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शितल ठोकळ, आशा दांडगे, मोहिनी गायकवाड, पूजा भोकरे, पूजा भालेराव, सुवर्णा सोनवणे, सागर आहेर, अनिल जीवरग, पवन गायकवाड, ऋतुजा हांडे, कल्याणी देवगिरी, शीतल आवटे, तेजस्विनी आगरे, दत्ताजी घाटे आदींनी पुढाकार घेतला होता.