
पुणे ः व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पुण्याच्या रक्षा गेले व यशदा शिंदे या दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
योगा असोशिएशन महाराष्ट्र व शाश्वत ग्लोबल आणि मल्टी पर्पस संस्था अमरावती
यांनी वैष्णवी हॉल, झिरी दत्तमंदिर, बडनेरा येथे यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय १३ वी राज्य योगासन स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. ही स्पर्धा पारंपारिक, रिदमीक व आर्टिस्टिक या प्रकारात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एकूण १४ जिल्ह्यांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेतून निवडण्या आलेला महाराष्ट्राचा संघ मिदनापूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या ३६व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. या राष्ट्रीय स्पर्धे मधून सर्व गटातील व प्रकारातील पहिल्या ५ क्रमांकामध्ये आलेले खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र झाले आहेत.
या स्पर्धेत डिवाइन योगा स्टुडिओचे खालील विद्यार्थी भारताचे हानोई, व्हिएतनाम येथे २८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होणाऱ्या १० व्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिपमध्ये प्रतिनिधित्व करतील.
पारंपारिक योगा प्रकारात सहा ते दहा वयोगटात पुणे जिल्ह्यातील रक्षा गेले व यशदा शिंदे या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. रक्षा व यशदा या डिव्हाईन योगा स्टुडिओच्या खेळाडू आहेत. हांडेवाडी येथील डिव्हाईन योगा स्टुडिओच्या रुपाली जगदाळे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे.
या स्पर्धा आयोजनासाठी अध्यक्ष सुनील शिंदे (अध्यक्ष), सचिव सुरेश गांधी, कलीम शहा, पंकज निर्मळ, योगा असोसिएशन महाराष्ट्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले.