शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून रंगणार

  • By admin
  • March 27, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

कॉस्मो फिल्म्स व शहर पोलिस यांच्यात उद्घाटनाची लढत

छत्रपती संभाजीनगर : शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित व कॉस्मो फिल्म्स वाळूज प्रायोजित ३२ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेस शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी ८ वाजता गरवारे क्रीडा संकुल सिडको येथे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी आणि कॉस्मो फिल्म्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चिंचोलीकर हस्ते उद्घाटन होणार आहे.

या प्रसंगी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर, उपाध्यक्ष दामोदर मानकापे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. यावर्षी एकूण २७ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी या हेतूने ज्येष्ठ कामगार नेते स्व उद्धव भवलकर व दामोदर मानकापे यांनी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ केला.

औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यासाठी सलग ३० वर्षे चालणारी ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेला वाळूज येथील कॉस्मो फिल्म्स कंपनीने स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहेत व प्रायोजित केले आहे.

ही स्पर्धा आयसीसी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार खेळवली जाईल. या स्पर्धेतील सामने शुक्रवार, शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघामध्ये एकाच उद्योगातील/अस्थापनातील दहा कामगार खेळाडू असणे गरजेचे आहे. तीन खेळाडू इतर संस्थांमधील/इतर अस्थापनातील तसेच एक ओपन खेळाडू संघामध्ये असून एक शालेय खेळाडू तसेच महाराष्ट्रातील असोसिएशन, कारखाने यांच्यात काम करणारे खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र राहतील.

उद्घाटन सोहळ्याला सर्व क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन गंगाधर शेवाळे, राजेश सिद्धेश्वर, अनंत नेरळकर, उदय बक्षी, संदीप भंडारी, सागर वैद्य, राकेश सूर्यवंशी, डॉ प्रशांत याकुंडी, जितेंद्र बरंजाळेकर, योगेश मानकापे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *