
जेएसडब्ल्यू इंडियन ओपन
मुंबई ः जेएसडब्ल्यू इंडियन ओपन स्पर्धेत अनाहत सिंग, जोशना चिनप्पा आणि अभय सिंग यांनी शानदार कामगिरी बजावत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
जेएसडब्ल्यू इंडियन ओपन ही भारताची पहिली पीएसए कॉपर स्पर्धा आहे. ही स्पर्धा बॉम्बे जिमखान्याच्या लॉनमधील आउटडोअर ग्लास कोर्टवर हलवल्यामुळे एक अनोखा ट्विस्ट आला आहे. उपांत्य फेरी व अंतिम फेरी देखील आउटडोअर ग्लास कोर्टवर होणार आहे.
भारताची नंबर वन अनाहत सिंग जेव्हा इजिप्तच्या नाडियन एल्हम्मीविरुद्ध खेळण्यासाठी कोर्टवर उतरली तेव्हा तिला सर्वात मोठा पाठिंबा लाभला. अनाहत सिंग हिने सामन्याची सुरुवात शानदार केली. परंतु, नाडियन एल्हम्मी हिने दबावात सुरेख खेळ करत २-१ अशी आघाडी घेण्यात यश मिळवले. त्यानंतर अनाहत हिने सामन्यात जोरदार पुनरागमन करत २-२ अशी बरोबरी साधली. अंतिम सेटमध्ये दोन्ही खेळाडू सरस खेळ करत होते. १७ वर्षीय अनाहत सिंग हिने मोठ्या जिद्दीने अखेरचा सेट जिंकून उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

भारताच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक जोशना चिनप्पा संध्याकाळच्या सत्रात काचेच्या कोर्टवर पहिली खेळाडू होती आणि तिचा सामना अव्वल मानांकित आकांक्षा साळुंखेविरुद्ध होता. एकमेकांचा खेळ चांगल्या प्रकारे जाणणाऱ्या या दोन्ही भारतीय खेळाडूंनी एकमेकांना शॉट फॉर शॉट पुट मध्ये बरोबरी साधली आणि चाहत्यांसाठी एक मनोरंजक स्पर्धा निर्माण झाली. सुरुवातीला चिनप्पाने काही अतिशय जवळचे सेट जिंकले, त्यानंतर साळुंखे हिनेही दोन सेट जिंकून सामना निर्णायक टप्प्यात नेला. बहुतेक वेळेस चुरशीच्या झालेल्या या सामन्यात चिनप्पाने तिच्या प्रतिस्पर्ध्याला ३-२ (१२-१०, १३-११, ९-११, ९-११, ११-५) असा पराभव केला.

पुरुषांच्या ड्रॉमध्ये भारताचा अभय सिंगही खेळत होता आणि त्याच्या मार्गात मलेशियन अमिशेनराज चंद्रन होता. जेएसडब्ल्यू इंडियन ओपनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या या भारतीय खेळाडूने मलेशियन खेळाडूला रोखून ठेवत आपला दर्जा दाखवत राहिला. अभयने कधीही त्याच्या प्रतिस्पर्ध्याला शांत बसू दिले नाही, कारण त्याने रेषेवरून धाव घेतली आणि ३४ मिनिटांत ३-० (११-५, ११-८, ११-७) अशी आघाडी घेऊन उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेच्या क्वार्टर फायनल टप्प्यातील अंतिम सामन्यात, वीर चोत्रानी हा इजिप्शियन करीम एल टॉर्की विरुद्ध खेळत होता. तथापि, त्याच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही वीर उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही आणि २७ मिनिटांत एल टॉर्कीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. इजिप्शियनने ०-३ (११-४, ११-८, ११-५) अशा गुणांसह विजय मिळवला.