ज्युडिशियल महिला संघाला विजेतेपद 

  • By admin
  • March 27, 2025
  • 0
  • 46 Views
Spread the love

अंतिम सामन्यात कोल्हापूरवर सहा विकेटने विजय, सायली लोणकर सामनावीर, अनुजा पाटीलचे शतक 

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत ज्युडिशियल महिला संघाने दणदणीत विजयासह विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात ज्युडिशियल संघाने कोल्हापूर महिला संघावर सहा विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यात सायली लोणकर हिने सामनावीर किताब संपादन केला. 

शिंदे हायस्कूल मैदानावर हा अंतिम सामना झाला. कोल्हापूर महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ५० षटकात सर्वबाद २२४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना ज्युडिशियल महिला संघाने ४४.४ षटकात चार बाद २२६ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला आणि विजेतेपद पटकावले. 

या सामन्यात कोल्हापूरच्या अनुजा पाटील हिने शानदार शतक झळकावले. अनुजाने ११४ चेंडूंचा सामना करत दोन षटकार व चौदा चौकारांसह ११२ धावांची वेगवान शतकी खेळी केली. अनुजाचे शतक संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. गौतमी नाईक हिने ६० चेंडूत ६० धावांची वेगवान खेळी केली. गौतमीने सात चौकार व एक षटकार मारला. अस्मी कुलकर्णी हिने ७१ चेंडूत ४६ धावांची दमदार खेळी केली. तिने सहा चौकार मारले. गोलंदाजीत ज्युडिशियल संघाच्या सायली लोणकर हिने २८ धावांत चार विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. या प्रभावी कामगिरीमुळे सायलीने सामनावीर पुरस्कार पटकावला. शरयू कुलकर्णी हिने ३२ धावांत तीन गडी बाद करत आपला ठसा उमटवला. शतकवीर अनुजा पाटील हिने ३० धावांत दोन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावत सामना गाजवला.

संक्षिप्त धावफलक ः कोल्हापूर महिला संघ ः ५० षटकात सर्वबाद २२४ (ए ए गायकवाड १७, परिणिता पाटील ९, सौम्यालता ४०, अनुजा पाटील ११२, इतर ३४, सायली लोणकर ४-२८, शरयू कुलकर्णी ३-३२, पूनम खेमनार २-४५, प्रज्ञा वीरकर १-४५) पराभूत विरुद्ध ज्युडिशियल महिला संघ ः ४४.४ षटकात चार बाद २२६ (गौतमी नाईक ६०, भाविका अहिरे ४४, प्रज्ञा वीरकर ८, अस्मी कुलकर्णी नाबाद ४६, सायली लोणकर नाबाद ३९, इतर २८, अनुजा पाटील २-३०, परिणिता पाटील १-३९, सेजल सुतार १-२७). सामनावीर ः सायली लोणकर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *