
सोलापूर ः सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांचा मुंबई येथे राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डेहराडून, उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांची महाराष्ट्र लॉन टेनिस संघाच्या व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने पदक तालिकेत तिसरा क्रमांक
पटकावला होता.
या स्पर्धेत संघ व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राजीव देसाई यांना राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुतार यांच्या हस्ते मुंबई येथे एका छोटेखानी कार्यक्रमात रिवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.