
मुलींच्या गटात क्रीडा सह्याद्री संघ उपविजेता
निफाड (जि. नाशिक) ः नाशिक येथे आयोजित जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत निफाड येथील क्रीडा सह्याद्री संघाने मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. क्रीडा सह्याद्री मुलींच्या संघाने उपविजेतेपद संपादन केले.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सीनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन विलास गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल नियम व माहिती सांगितली.
उपविजेत्या क्रीडा सह्याद्री मुलींच्या संघामध्ये कर्णधार आराध्या सालमुठे, श्रद्धा मोगल, वेदिका कुशारे, अनुष्का कुशारे, स्वानंदी बिदे, तनिष्का निकम, श्रेयसी माळी, कृतिका मोगल, मोक्षदा जाधव, धनश्री पातळे या खेळाडूंचा समावेश आहे.
विजेतेपद पटकावणाऱया क्रीडा सह्याद्री मुलांच्या संघात दक्ष गायकवाड (कर्णधार), सिद्धेश मेमाणे, नैतिक दायमा, नूतन शर्मा, रणवर गुप्ता, साई जाधव, ऋषभ बागडे, ऋतुराज आंधळे, वेदांत शेजवळ, रेहान खानराजे, सक्षम गायकवाड या खेळाडूंचा समावेश होता. या संघाने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करत संघाला प्रथम पारितोषिक मिळवून दिले. क्रीडा सह्याद्रीचे खेळाडू तमन्ना तांबोळी व करुणा शिंदे यांची नाशिक येथे होत असलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली.
या शानदार कामगिरीबद्दल क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड, क्रीडा सह्याद्री सदस्य प्रतीक्षा कोतकर, कीर्ती कोटकर, विजय घोटेकर, लखन घडमाळे, विनोद गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या दोन्ही संघांना क्रीडा प्रशिक्षक विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.