
हिंगोली ः नेहरू युवा केंद्र हिंगोली व मेरा युवा भारत हिंगोली युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने शहीद दिन पांडुरंग माध्यमिक विद्यालय समगा येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. नेहरू युवा केंद्र हिंगोलीचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण नरवाडे, प्रमुख पाहुणे प्रवीण पांडे, एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव गजानन आडे उपस्थित होते.
प्रवीण पांडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले राष्ट्रनिर्माणासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे. देशभक्तीचे विचार अंगिकारले पाहिजे व देशाप्रती काहीतरी चांगले करण्याची आस्ता असावी. शहीद दिवसाच्या निमित्ताने भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. भाषण स्पर्धेत जिंकलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण नरवाडे यांनी नेहरू युवा केंद्र हे युवकांना चालना देण्यासाठी कार्य करत राहतात. देशभक्तीच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोली यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सुकने यांनी केले. यावेळी शाळेतील जाधव, बोरकर, पाटील, देशमुख, दांडेगावकर, मोरतळे व विद्यार्थी उपस्थित होते.