
मुंबई : ओम् कबड्डी प्रबोधिनीने भारती देसाई आणि गोपाळ लिंग यांना यंदाचे आपले पुरस्कार जाहीर केले.

तेहरान, इराण येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व करून सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या सोनाली शिंगटेचा देखील यावेळी सन्मान करण्यात येईल. स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. ओम् कबड्डी प्रतिवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी आपला वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी ज्यांनी मुंबई, महाराष्ट्राला कबड्डीत दैदिप्यमान यश मिळवून दिले अशा खेळाडूंना सन्मानित करते. त्याच बरोबर त्यांची व त्यांच्या खेळाची नवोदितांना ओळख करून दिली जाते.
यंदाचा हा २२वा वर्धापन दिन रविवारी (३० मार्च) सायंकाळी ७ वाजता कित्ते भंडारी सभागृह, गोखले रोड, दादर (पश्चिम) येथे साजरा करण्यात येणार आहे. आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिनभाऊ अहिर, स्थानिक आमदार महेश सावंत, माजी महापौर महादेव देवळे, भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन मुरारी कदम यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.