राज्य कॅरम स्पर्धेत सागर, काजलला अग्र मानांकन

  • By admin
  • March 28, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

विलेपार्ले येथे शनिवारपासून प्रारंभ 

मुंबई ः रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू यांच्या सहकार्याने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले (पूर्व) येथे २९ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता पुरुष एकेरी गटाने ५ व्या राज्य मानांकन स्पर्धेची सुरुवात होत आहे. तर ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून महिला एकेरी गटांच्या समन्यास प्रारंभ होईल. 

पुरुष गटात २६० तर महिला गटात ४० खेळाडूंनी भाग घेतला असून पुरुष एकेरी गटात पुण्याच्या सागर वाघमारे तर महिला एकेरी गटात मुंबईच्या काजल कुमारीला अग्र  मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील महत्वाच्या लढतींचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार असल्याने कॅरम रसिकांना घरबसल्या स्पर्धेचा आनंद घेता येईल. दोनही गटांचे उप उपांत्य फेरी पासूनचे सामने ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खेळविण्यात येतील.

स्पर्धेतील मानांकन

पुरुष एकेरी : १) सागर वाघमारे (पुणे), २) महम्मद घुफ्रान (मुंबई), ३) विकास धारिया (मुंबई), ४) संजय मांडे (मुंबई), ५) योगेश परदेशी (पुणे), ६) प्रशांत मोरे (मुंबई), ७) हरेश्वर बेतवंशी (मुंबई) ८) संदीप दिवे (मुंबई उपनगर).

महिला एकेरी : १) काजल कुमारी (मुंबई), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ४) रिंकी कुमारी (मुंबई), ५) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ६) मिताली पाठक (मुंबई), ७) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ८) श्रुती सोनावणे (पालघर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *