
छत्रपती संभाजीनगर ः गुरुकुल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १४ व अंडर १६ आंतर क्रिकेट अकादमी चॅलेंजर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला शनिवारी (२९ मार्च) प्रारंभ होणार आहे, अशी माहिती गुरुकुल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक श्रेयस मगर यांनी दिली.

पडेगाव भागातील डी वाय पाटील स्पोर्ट्स व्हिलेज मैदानावर आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धा २९ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेत तीन अकादमी संघांचा सहभाग आहे. गुरुकुल रेड, गुरुकुल ब्लू व गुरुकुल ग्रीन अशा तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा २५ षटकांची असून प्रत्येक संघ चार लीग सामने खेळणार आहे.
या स्पर्धेमुळे गुरुकुल क्रिकेट अकादमीत नियमित प्रशिक्षण घेणाऱया खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचा खेळाडूंना मोठा फायदा होईल, असे गुरुकुल अकादमीचे मुख्य प्रशिक्षक व स्पर्धेचे मुख्य संयोजक श्रेयस मगर यांनी सांगितले.