
नागपूर : दिल्ली पब्लिक स्कूल द्वारा आयोजित पहिल्या पूलऑलिम्पिक आंतरशालेय जलतरण स्पर्धेत शार्क ऍक्टिव्हिटी स्पोर्टिंग असोसिएशनची जलतरणपटू भावी राजगिरे हिने ३ सुवर्णपदक पटकावत आपला दबदबा कायम ठेवला.
११ वर्षांखालील मुलींच्या गटात भावी राजगिरे हिने ५० मीटर फ्रीस्टाइल हे अंतर ३७.०५ सेकंदात पार करीत पहिले सुवर्णपद पटकावले, तर ५० मीटर बेस्ट स्ट्रोक मध्ये हे अंतर ५०.४३ इतक्या सेकंदात पार करीत दुसरे सुवर्ण, तर ५० मीटर बॅक स्ट्रोक हे अंतर ४३.७५ सेकंदात पार करीत तिसरे सुवर्णपदक प्राप्त केले.
भावी राजगिरे ही संजूबा सीबीएससी बहादुरा येथे वर्ग चौथीमध्ये शिकत आहे. या शानदार कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि आई-वडील, प्रशिक्षक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.