
अथर्व जगताप सामनावीर, अहीवळे, शर्मा व राठाडे यांची शानदार अर्धशतके
सोलापूर ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे वतीने छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्हा संघाने सलामीच्या सामन्यात झोराष्ट्रीयन क्लबचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. पाच बळी टिपणारा अथर्व जगताप यास सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झोराष्ट्रीयन क्लबने ५७ षटकात सर्वबाद १८० धावा केल्या. त्यांच्याकडून राहुल पाटील ३७, अर्हम जैन २९, प्रथमेश खोत २२ धावा तर प्रित्विराज जाधव याने २१ धावा केल्या. सोलापूरकडून अथर्व जगताप याने ५ तर अभय लवांडने २ तर समर्थ दोरनाल व श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

सोलापूरने पहिल्या डावात ७५ षटकात सर्वबाद २७१ धावा केल्या गेल्या. सुमित अहीवळे याने सर्वाधिक ७७ धावा केल्या. विरांश वर्मा ७४ आणि आदर्श राठोड याने ५६ धावा करीत त्याला साथ दिली. झोराष्ट्रीयन संघाकडून कर्णधार पार्थ पवार याने ४ बळी तर ओंकार कदम याने २ गडी बाद केले.

झोराष्ट्रीयन संघाने दुसऱ्या डावात ३६ षटकात ५ गडी बाद १०४ धावा केल्या. यामध्ये पार्थ गनबावले २८ व अर्हम जैन याने २३ धावा केल्या. सोलापूर संघाकडून समर्थ कोळेकर याने ३ गडी बाद केले.