
परभणी ः परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार गीता मनोहर साखरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
गीता साखरे यांनी शुक्रवारी परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. या प्रसंगी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, अधिक्षक दीपक जगदाळे, खुणे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, तेजस कुलकर्णी, रोहन औंढेकर, कल्याण कोल्हे, गजानन इंगोले, पंडित आदी क्रीडा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.