
प्रशिक्षक विलास गायकवाड यांचा पुढाकार
निफाड ः क्रीडा सह्याद्री निफाड व मार्शल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट इंडिया व शिव अविष्कार स्पोर्ट फाउंडेशन नाशिक व पोलिस मित्र परिवार समन्वय समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड तालुक्यातील लहान लहान गावातील विद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्याच्या तसेच गावातील चौकामध्ये मुलींच्या संरक्षणाचे महत्व व संरक्षणाचे सोप्या सोप्या आणि निडरपणाने करता येणारे डावपेच प्रशिक्षक विलास गायकवाड शिकवत आहेत.
निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पिंपळस (रामाचे) मध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक व प्रत्येक मुलीने डोळे उघडे ठेवून आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आपल्या घरातल्या किंवा जवळच्या व्यक्तींना सांगाव्यात व मन मोकळे करावे त्यामुळे खूप अनर्थ टळतील असे मत शाळेच्या मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने यांनी व्यक्त केले.
नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त व तालुक्यातील ग्रामीण भागातील गावागावात जाऊन मुलींना व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे विलास गायकवाड यांचा मानस आहे.
प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्याकरिता गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, एमटीआय मार्शल आर्टचे अध्यक्ष अनिल जाधव, मोसिन मनियार, योगेश देशमुख, मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने, पिंपळस रामाचे सरपंच, उपसरपंच, एसएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्या व शिक्षिका व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे यांनी केले. विलास गायकवाड यांचे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन लाभत आहे.