
ठाणे ः एस एम एम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ठाणे या शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला.
शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सणांचे महत्व कळावे या हेतूने ही शाळा सर्व सण नेहमीच साजरे करते. शाळेत गुढी उभारून नवा वर्षाची स्वागत यात्रा चरई विभागातून काढण्यात आली .या वेळी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नद्यांचे संरक्षण करा हा संदेश या चिमुकल्यांनी देत जनजागृती केली.
या स्वागत यात्रेसाठी विद्यार्थी पारंपरिक वेषात आले होते. यामध्ये शाळेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, विश्वस्त मुकणे, गोरे, करंजकर, सुर्वे, ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीता मिरकर, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.