
ठाणे ः श्री मावळी मंडळ ठाणे शताब्दी वर्षानिमित्त व एस एम एम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ठाणे नववर्ष स्वागतासाठी कौपीनेश्वर मंदिर न्यास आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, मासुंदा तलाव, ठाणे येथे रविवारी (३० मार्च) सकाळी ६.३० वाजता निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत एस एम एम हायस्कूल छात्रसेना, एस एम एम हायस्कूलचे लेझीम पथक, मराठी अभिजात भाषा आधारित चित्र रथ, श्री मावळी मंडळ संस्थेचे खेळाडू, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी, संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
ठाणे शहरातील समस्त क्रीडाप्रेमी, क्रीडा बांधव तसेच एस एम एम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ठाणेचे आजी-माजी विद्यार्थी बांधवांनी या नववर्ष स्वागत यात्रेत पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन श्री मावळी मंडळ ठाणे अध्यक्ष सुधाकर मोरे, सर्व विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व सर्व क्रियाशील कार्यकर्ते, संस्थेचे उपसचिव व स्वागतयात्रा प्रमुख संतोष सुर्वे, शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रोशन वाघ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उत्कर्षा हवालदार तसेच शाळेचे स्वागत यात्रा प्रमुख आणि ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.