आंतरराष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्सच्या पंच परीक्षेत डॉ मकरंद जोशी, सिद्धार्थ कदम उत्तीर्ण

  • By admin
  • March 29, 2025
  • 0
  • 79 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स पंच परीक्षेत डॉ मकरंद जोशी व सिद्धार्थ कदम यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

मनीला, फिलिपिन्स येथे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे एरोबिक्स जिम्नॅस्टिकच्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत भारतातून चार पंच परीक्षेसाठी पाठवण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राचे डॉ मकरंद जोशी व सिद्धार्थ कदम हे या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

डॉ मकरंद जोशी हे २००१ पासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होणारे भारताचे सर्वात अनुभवी पंच आहेत. दर ऑलिम्पिक नंतर होणाऱ्या जिम्नॅस्टिक्स मधील गुणप्रदान संहिते नुसार पंच परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. डॉ मकरंद जोशी यांनी २००१, २००५, २००९, २०१३, २०१७, २०२२ व २०२५ अशा सात ऑलिम्पिक सायकलच्या परीक्षा सातत्याने उत्तीर्ण होत पंच पात्रता ३ स्तर प्राप्त केला आहे. हा स्तर प्राप्त करणारे ते भारतातील एकमेव पंच आहेत. तसेच त्यांची एशियन जिम्नॅस्टिक्स युनियनवर एरोबिक जिम्नॅस्टिक्सच्या तांत्रिक समितीचे सचिव म्हणून २०२३ पासून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिद्धार्थ कदम यांनीही २०१७, २०२२ व २०२५ च्या तीन ऑलिम्पिक सायकलच्या पंच परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत आपला ठसा उमटवला आहे.

दोघांचेही या यशाबद्दल जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, कोषाध्यक्ष कौशिक बिडीवाला, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, भारतीय क्रीडा प्राधिकरण एनसीओई पश्चिम विभाग केंद्राच्या उपसंचालक डॉ मोनिका घुगे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ सागर कुलकर्णी, डॉ विशाल देशपांडे, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहित रोंघे, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, तनुजा गाढवे यांनी सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *