खराब क्षेत्ररक्षणामुळे पराभव झाला ः ऋतुराज गायकवाड 

  • By admin
  • March 29, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

चेन्नई ः चेन्नई सुपर किंग्ज संघाला आरसीबी संघाविरुद्ध तब्बल २००८ नंतर सामना गमवावा लागला. कर्णधार रुतुराज गायकवाड याने खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्ही सामना गमावला अशी कबुली दिली. 

आयपीएल मधील दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला आरसीबीविरुद्ध पाच विकेटने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात चेन्नईचे गोलंदाज आणि फलंदाज खूपच अपयशी ठरले. चेन्नईने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याला तीन जीवदान दिले, ज्याने अर्धशतक झळकावून संघाला सात बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर सीएसके संघ फक्त १४६ धावा करू शकला. कर्णधार गायकवाड याने सामन्यातील पराभवासाठी खराब क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले.

पराभवानंतर कर्णधार रुतुराज गायकवाड म्हणाला की, मला अजूनही वाटते की या मैदानावर १७० धावांचा स्कोअर योग्य होता. इथे फलंदाजी करणे सोपे नव्हते. खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्ही सामना गमावला. जर तुम्ही १७० धावांचे लक्ष्य गाठत असता तर आणखी काही वेळ मिळाला असता. पण २० अतिरिक्त धावा देण्यासाठी पॉवरप्लेमध्ये वेगळ्या पद्धतीने खेळावे लागते, जे आम्ही करण्यात अयशस्वी झालो. आम्ही झेल सोडले आणि त्यांचे फलंदाज चौकार आणि षटकार मारत राहिले. शेवटच्या षटकापर्यंत त्याचा धावगती कमी झाली नाही. आम्हाला वाटते की आम्हाला आमच्या क्षेत्ररक्षणावर कठोर परिश्रम करावे लागतील.

फलंदाजांची खराब कामगिरी 
रचिन रवींद्र वगळता चेन्नई सुपर किंग्जचा दुसरा कोणताही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही. संघाकडून रचिनने ४१ धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडला खातेही उघडता आले नाही. राहुल त्रिपाठी, सॅम करन आणि दीपक हुडा यांनाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. शेवटी रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी काही मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जडेजाने २५ धावा केल्या आणि धोनीने ३० धावा केल्या.

हा विजय खास ः रजत पाटीदार
५१ धावांच्या खेळीसाठी आरसीबीचा ‘सामनावीर’ म्हणून निवडलेला रजत पाटीदार म्हणाला की, या मैदानावर ही एक चांगली धावसंख्या होती. कारण चौकार आणि षटकार मारणे सोपे नव्हते. १७ वर्षांनंतर चेपॉक येथील विजयाबद्दल पाटीदार म्हणाला की, चेन्नईचे चाहते त्यांच्या संघाला ज्या पद्धतीने प्रोत्साहन देतात त्यामुळे येथे विजय मिळवणे नेहमीच खास असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *