
शुभंकर काळे, रबमीत सिंग सोधी, जपमन कौरची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः गुरुकुल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल यलो आर्मी संघाने गुरुकुल सनरायझर्स संघाचा चार विकेट राखून पराभव केला. या सामन्यात शुभंकर काळे याने सामनावीर किताब मिळवला.

पडेगाव येथील डीवाय पाटील क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. गुरुकुल सनरायझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २०.५ षटकात सर्वबाद १२२ धावा काढल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुरुकुल यलो आर्मी संघाने १८.१ षटकात सहा बाद १२३ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात एजी याने २३ चेंडूत सर्वाधिक ४३ धावा काढल्या. त्याने चार उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. जपमन कौर सोधीने ४८ चेंडूत ४१ धावा फटकावल्या. सोधीने सात चौकार मारले. अर्चित देशमुख याने ३३ चेंडूत ३७ धावांची वेगवान खेळी केली. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत शुभंकर काळे याने १७ धावांत चार विकेट घेत सामनावीर पुरस्कार मिळवला. रबमीत सिंग सोधी याने २८ धावांत चार बळी घेत आपला ठसा उमटवला. अर्णव देशमुख याने १९ धावांत दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक ः गुरुकुल सनरायझर्स ः २०.५ षटकात सर्वबाद १२२ (जपमन कौर सोधी ४१, प्रवीण भवानी १७, आर्यन गवळी ५, शौर्य राठोड ६, रबमीत सिंग सोधी ७, इतर ३६, शुभंकर काळे ४-१७, अर्णव देशमुख २-१९, अर्चित देशमुख १-१२, विराज कानडे १-२६, विराज झंपले १-१८, सिद्धवेद गोसावी १-१५, एजी १-१६) पराभूत विरुद्ध गुरुकुल यलो आर्मी ः १८.१ षटकात सहा बाद १२३ (एजी ४३, अर्चित देशमुख नाबाद ३७, गुणाधिश तासेवाल ८, विराज कानडे नाबाद ११, इतर २२, रबमीत सिंग सोधी ४-२८, जपमन कौर सोधी १-१२, आदित्य श्रीमाळी १-१०). सामनावीर ः शुभंकर काळे.