
शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः मयंक विजयवर्गीय, सय्यद परवेझ, महेश दसपुते सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः कॉस्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित ३२व्या शहीद भगतसिंह क्रिकेट स्पर्धेत साखळी सामन्यात शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रुचा इंजिनिअरिंग संघाने एसटी महामंडळ संघावर ५ गडी राखून विजय नोंदवला. गुड इयर संघाने प्रिसिशन पावर संघावर १४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात होमिओपॅथिक डॉक्टर्स संघाने लॅब टेक्निशियन संघावर ५ गडी राखून विजय संपादन केला. या लढतीत मयंक विजयवर्गीय, सय्यद परवेझ व महेश दसपुते यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना ऋचा इंजीनियरिंग व एसटी महामंडळ या संघादरम्यान खेळविण्यात आला. रुचा इंजिनिअरिंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एसटी महामंडळ संघातर्फे फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १३५ धावा केल्या. यामध्ये कर्णधार मधुकर साळवे याने ४४ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ६ चौकारांसह ५३ धावा, सागर वाकळे याने २० चेंडूत २ चौकारांसह २१ धावा तर प्रदीप तगड याने १६ चेंडूत ३ चौकारांसह १८ धावांचे योगदान दिले. तर बाकीचे फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही.
रुचा इंजीनियरिंग संघातर्फे गोलंदाजी करताना मयंक विजयवर्गीय याने १४ धावात २ गडी तर ऋषिकेश कदम, रोहित दशराथी व अमर यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात रुचा इंजिनिअरिंग संघाने विजयी लक्ष १९ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये कर्णधार राजेंद्र तुपे याने ४१ चेंडूत ४ चौकारांसह ३७ धावा, मयंक विजयवर्गीय याने ४३ चेंडूत ३ चौकारांसह ३२ धावा, अमर यादव याने ११ चेंडूत १ उत्तुंग षटकार व ४ चौकारांसह २५ धावा तर लहू लोहार याने १३ चेंडूत ३ चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले. एसटी महामंडळ संघातर्फे गोलंदाजी करताना अतुल पाटील याने ३२ धावात ३ गडी तर कैलास जाधव याने २४ धावात १ गडी बाद केला.

दुसरा सामना प्रिसिशन पावर व गुड इयर या संघा दरम्यान खेळविण्यात आला. प्रेसिशन पावर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गुड इयर संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये अरुण राजा याने ३३ चेंडूत १ षटकार व ६ चौकारांसह ५१ धावा, सुनील जाधव याने ३७ चेंडूत २ षटकार व ३ चौकारांसह ४० धावा, परवेझ सय्यद याने १४ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह २७ धावा, कर्णधार जितेंद्र निकम याने १८ चेंडूत ३ चौकारांसह २४ धावा तर अरविंद यादव याने १० चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह १७ धावांचे योगदान दिले.
प्रिसिशन पावर संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार नितीन कुटे याने १९ धावात ३ गडी, प्रदीप वाघ याने ३० धावांत २ गडी तर ह्रिदम साहुजी व विशाल शिंदे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात प्रिसिशन पावर संघ ४७ धावात गारद झाला. यामध्ये ओमकार बिरोटे याने १२ चेंडूत २ षटकार व ३ चौकारांसह २६ धावांचे योगदान दिले तर बाकीचे फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. गुड इयर संघातर्फे गोलंदाजी करताना परवेझ सय्यद याने अप्रतिम व भेदक गोलंदाजी करत केवळ ८ धावात ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले तर अविष्कार ननावरे याने १३ धावात ३ गडी,सागर दुबे याने २५ धावात २ गडी तर अरुण राजा याने १ गडी बाद केला.

तिसरा सामना लॅब टेक्निशियन व होमिओपॅथिक डॉक्टर्स या संघात खेळविण्यात आला. लॅब टेक्निशियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केवळ १६ षटकात सर्वबाद ७९ धावा करू शकला. यामध्ये इरफान पठाण याने सर्वाधिक १३ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २२ धावा, कर्णधार नेताजी सापटे याने २५ चेंडूत २ चौकारासह २१ धावा तर ज्ञानेश्वर चव्हाण याने १६ चेंडूत २ चौकारांसह दहा धावांचे योगदान दिले.
होमिओपॅथिक डॉक्टर्स संघातर्फे गोलंदाजी करताना महेश दसपुते याने अप्रतिम व भेदक गोलंदाजी करत केवळ ५ धावात ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले तर रबमीत सोधी याने ७ धावात ३ गडी, लक्ष्मण सूर्यवंशी याने २ धावात २ गडी तर मयूर राजपूत याने २३ धावात १ गडी बाद केला.
होमिओपॅथिक डॉक्टर्स संघाने विजयी लक्ष १५ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये मयूर राजपूत याने २४ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह ३४ धावा, संदीप सानप याने २१ चेंडूत १ चौकारासह १७ धावा तर महेश दसपुते याने ७ चेंडूत २ चौकारांसह १० धावांचे योगदान दिले.
लॅब टेक्निशियन संघातर्फे गोलंदाजी करताना मोहसीन खान याने १८ धावात २ गडी तर उमेश पवार व कर्णधार नेताजी सापटे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
या सामन्यात पंचाची भूमिका राजेश चांदेकर, विशाल चव्हाण, अजय देशपांडे, सुनील बनसोडे, प्रसाद कुलकर्णी तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
रविवारचे सामने
सेंट्रल बँक व कंबाईंड बँकर्स (सकाळी ८ वाजता), सेन्ट्रल वर्कशॉप व वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ (सकाळी ११ वाजता), महावितरण ‘ब’ आणि महावितरण अ (दुपारी २ वाजता).