
चेन्नई ः लखनौ सुपरजायंट्स संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करत अनपेक्षितपणे पर्पल कॅप पटकावली. मात्र, अवघ्या २४ तासांत २० वर्षीय फिरकी गोलंदाज नूर अहमद याने पर्पल कॅपवर आपला दावा दाखल केला.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने पर्पल कॅप संपादन केली. पण २४ तासांच्या आत, २० वर्षांच्या स्टार नूर अहमद याने त्याच्याकडून ही पर्पल कॅप हिसकावून घेतली. नूर अहमद या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर पोहोचला.
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. याच सामन्यात २० वर्षीय नूर अहमद याने शार्दुल ठाकूरला मागे टाकले आणि पर्पल कॅप संपादन करण्याच्या शर्यतीत अव्वल स्थान मिळवले.
२४ तासांच्या आत शार्दुल ठाकूरकडून पर्पल कॅप हिसकावून घेणारा गोलंदाज अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज नूर अहमद आहे. नूर आयपीएल स्पर्धेमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. नूर अहमदने पहिल्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या आणि आरसीबीच्या तीन फलंदाजांना बाद केले. यासह, त्याने दोन सामन्यांमध्ये एकूण ७ बळी घेतले आणि शार्दुल ठाकूर (६ बळी) याला मागे टाकत पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. नूर याने आरसीबी संघाविरुद्ध अद्भुत गोलंदाजी केली.
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत नूर अहमद (७ विकेट), शार्दुल ठाकूर (६ विकेट), जोश हेझलवूड (४ विकेट), खलील अहमद (३ विकेट), कृणाल पंड्या (३ विकेट) यांच्यात पर्पल कॅपसाठी चुरशीची झुंज होत आहे.