
सोलापूर ः करमाळा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन शूटिंग बॉल स्पर्धेत संगमेश्वर कॉलेज संघाने विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात संगमेश्वर कॉलेज संघाने के एन भिसे कॉलेज कुर्डूवाडी संघाचा २-० सेटने पराभव केला व विजेतेपद संपादन केले. तत्पूर्वी, उपांत्य सामन्यात त्यांनी करमाळ्याच्या प्रतापसिंह मोहिते पाटील कॉलेजचा २-०0 सेटने पराभव केला. कैफ इनामदार, झैद हिरापुरे, उमरान रायचूरकर, फरहान पठाण, प्रताप सुरवसे, मलिक नदाफ, अजिंक्य पाटील यांनी संघास विजेतेपद मिळवून दिले.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक संतोष खेंडे, विक्रांत विभुते व शरण वांगी यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी, प्राचार्य डॉ ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदींनी अभिनंदन केले.