गुड मॉर्निंग स्पोर्ट्स संघाने पटकावला रामसिंग चषक

  • By admin
  • March 30, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

मुंबई : प्रभादेवी येथील राजाराम साळवी क्रीडांगणावर झालेल्या रामसिंग चषकाच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने शानदार कामगिरी करत अंकुर स्पोर्ट्सचा पराभव केला आणि रोख ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रतिष्ठेचा चषक आपल्या नावे केला.

गुड मॉर्निंग संघाच्या विजयात शार्दुल पाटीलने महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून एलईडी टीव्ही प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या अंकुर स्पोर्ट्सला ९ हजार रुपये रोख रक्कम आणि चषकावर समाधान मानावे लागले.

गुड मॉर्निंगची धमाकेदार सुरुवात
गुड मॉर्निंग स्पोर्ट्स संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पहिल्या सत्रात २ लोण देत २२-११ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात संघाने खेळ अधिक सावध करत आघाडी राखण्यावर भर दिला आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले. शार्दुल पाटील आणि साहिल राणे यांच्या आक्रमक चढायांना सर्वेश पांचाळच्या भक्कम बचावाची मोलाची साथ दिली.

अंकुर संघाचा अखेरच्या क्षणी संघर्ष
अंकुर स्पोर्ट्स संघाच्या सुशांत साईल, अभि भोसले आणि प्रयाग दळवी यांनी उत्तरार्धात खेळ गतिमान करत एक लोण परत फेडत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामना रंगतदार झाला, पण विजयाच्या उंबरठ्यावर ते अपयशी ठरले.

उपांत्य फेरीतील रोमांचक सामने
गुड मॉर्निंग स्पोर्ट्स संघाने उपांत्य फेरीत विजय नवनाथ संघाचा, तर अंकुर स्पोर्ट्सने सिद्धीप्रभा फाउंडेशनचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

विशेष पुरस्कार विजेते

• सर्वोत्तम चढाई खेळाडू : सुशांत साईल (अंकुर स्पोर्ट्स)
• सर्वोत्तम पकडीचा खेळाडू : साहिल राणे (गुड मॉर्निंग स्पोर्ट्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *