छत्रपती संभाजीनगर ः पोखरी येथील ज्ञानदा इंग्लिश स्कूलतर्फे उन्हाळी टॅलेंट स्पर्धेचा मेळावा आयोजन करण्यात आला आहे. या मेळाव्यात एकूण सहा स्पर्धा भरविण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सोमवारी (३१ मार्च) ज्ञानदा इंग्लिश स्कूल पोखरी येथे सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. ही स्पर्धा वर्ग नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत बुद्धिबळ, डान्स, पब्लिक स्पिकिंग, म्युझिक, चित्रकला व हस्ताक्षर अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा विनाशुल्क ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ज्ञानादा शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जैस्वाल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9403277807 व 9371678231 या क्रमांकावर संपर्क साधावा.