
परभणी ः परभणी जिल्ह्यातील क्रीडा विकासाला प्राधान्य देण्याचा मानस परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी व्यक्त केला आहे.
गीता साखरे यांनी परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांनी गीता साखरे यांची भेट घेऊन स्वागत केले.
छत्रपती संभाजीनगर येथे गीता साखरे या तालुका क्रीडा अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. कबड्डी खेळाच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्या कार्यरत आहेत. गीता साखरे यांनी परभणी येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले आहे. परभणी जिल्ह्यात कबड्डी खेळाचे अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. खेळाडूंना क्रीडा सुविधा, तालुका, जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन जिल्ह्याचा विकास करण्याचा मानस गीता साखरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.
या प्रसंगी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, दीपक जगदाळे, अंबादास शिंदे, शिवाजी वाघमारे, रणजित काकडे, गणेश माळवे, किशन भिसे, प्रशांत नाईक, ज्ञानेश्वर ठोंबरे, प्रसेनजित बनसोडे, माणिक कदम, रमेश खुणे, सुयश नाटकर, तेजस कुलकर्णी, रोहन औंढेकर, कल्याण पोले, गजानन इंगोले, प्रकाश पंडित, माया जमधाडे, शेख फराह, शितल शिंगणकर आदी उपस्थित होते.