
दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात हेल्थ अँड वेलनेस या विषयावर व्याख्यान
छत्रपती संभाजीनगर ः वाळूज येथील दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत हेल्थ अँड वेलनेस या विषयाच्या संदर्भात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून राजश्री शाहू महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ मधुकर वाकळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय सांभाळकर हे अध्यक्षस्थानी होते. या व्याख्यानामध्ये डॉ वाकळे यांनी शारीरिक मानसिक तसेच सामाजिक आरोग्याविषयी जागरूकता असेल तर मनुष्याची सर्वांगीण विकास व यश प्राप्त होते, हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. आजची युवा पिढी ही स्वतःला वेळ देण्यापेक्षा मोबाईलला जास्त महत्त्व देत आहे यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे शारीरिक शिक्षण विषय हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना रोज सकाळ-संध्याकाळ स्वतःसाठी एक तास द्यावा असेही वाकळे यांनी सांगितले. तसेच एप्रिल आणि मे हा महिना उन्हाळ्याच्या कडाक्याने ४० अंश सेल्सिअस वाढत असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या असेही सल्ला त्यांनी दिला. अत्यंत सोप्या शब्दात हेल्थ आणि वेलनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यावेळी उपप्राचार्य डॉ संजय सांभाळकर यांनी हेल्थ अँड वेलनेस या विषयाला युवा भारत सक्षम करण्याकरिता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. यावेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ भरतसिंग सलामपुरे यांनी प्रास्ताविक केले. तसेच डॉ अनिता पारगावकर यांनी आभार मानले. तसेच शिक्षक तर कर्मचारी अनिल तांबे, अमोल वाघमारे, अनिल पेरकर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.