
खेळाडू आरक्षणातून पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड
बीड ः सैनिकी विद्यालयाचा माजी राष्ट्रीय खो-खो खेळाडू रवींद्र नहिराळे याची शासनाच्या खेळाडू आरक्षणातून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल डॉ योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवगण शिक्षण संस्था, राजुरी नवगण संचलित सैनिकी विद्यालय बीड या शाळेतील माजी विद्यार्थी रवींद्र नहिराळे याची शासनाच्या खेळाडूंसाठी असलेल्या आरक्षणातून पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. रवींद्र याने २०१४ व २०१६ साली असो दोन वर्ष राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत २ रौप्यपदके जिंकले होती. यापूर्वीही सैनिकी विद्यालयातील जवळपास १६ खेळाडूंना शासकीय सेवेत संधी मिळाली आहे.
रवींद्र नहिराळे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी प्राचार्य खोड, डॉ अविनाश बारगजे, श्रीमंत राठोड, राजकुमार ससाणे, सेनापदक विजेते मेघराज कोल्हे व रवींद्र नहिराळे याचे काका नहीराळे आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ योगेश क्षीरसागर यांनी रवींद्र नहिराळे याची चौकशी करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रवींद्र नहिराळे यांनी सैनिकी विद्यालय बीड क्रीडा विभागाचे आभार मानले. नवगण शिक्षण संस्था, राजुरी नवगणच्या उपाध्यक्षा डॉ दीपाताई क्षीरसागर, डॉ सारिकाताई क्षीरसागर, संस्था प्रशासक डॉ व्ही टी देशमाने, डॉ सुधाकर गुट्टे यांनीही रवींद्र नहिराळे याचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.