केआरटी महाविद्यालयात योग व शारीरिक क्षमता विषयावर कार्यशाळा

  • By admin
  • March 30, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

नाशिक ः नाशिक जिल्ह्यातील वणी येथे के आर टी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात योग आणि शारीरिक क्षमता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ वाय एम साळुंखे, डॉ सुरेश इंगळे, डॉ दिनेश उकर्डे आणि नामदेव पैठणी यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी डॉ सुरेश इंगळे यांनी योग आणि वेलनेस या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योग आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा असून त्याबद्दल आपण अनुभव घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शारीरिक शिक्षण आणि शारीरिक क्षमता यामध्ये कशी वाढ होईल याविषयी मार्गदर्शन करताना योग आणि शारीरिक क्षमता याबद्दल विद्यार्थ्यांनी आपली जागरूकता वाढवणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला आहार सकस आणि संतुलित असावा असे त्यांनी यावेळेस सांगितले.

डॉ दिनेश उकिरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शारीरिक क्षमता ही खूप महत्त्वाची असून शारीरिक क्षमता जर चांगली असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप प्रभावी असे कार्य करता येते शारीरिक क्षमता कशी वाढेल आणि ती टिकून ठेवण्यासाठी आपण योग आणि फिटनेस याचा कसा उपयोग करून आपला जीवन आनंदमय आणि स्वस्त बनवू शकतो असे त्यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नामदेव पैठणी यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतीद्वारे योग प्राणायाम याची प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना योगाचा आणि प्राणायामाचा अनुभव दिला. त्याचबरोबर ध्यान करून घेतले आणि योगाचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगितले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे आणि उपप्राचार्य डॉ वाय एम साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील डॉ प्रवीण कांबळे, प्रा उमेश देशमुख, प्रा सचिन लोखंडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रवींद्र चव्हाण यांनी केले आणि आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *