
सोलापूर ः गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत येथील धनुर्धर आर्चरी अकादमीच्या स्वरीत ढवन याने सांघिक व वैयक्तिक एलिमेशनमध्ये अशी २ रौप्य पदके प्राप्त केली.
स्वरीत सध्या कुमठा नाका येथे सुरू असलेल्या धनुर्धर आर्चरी अकादमी येथे आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक दिपक चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना उपाध्यक्ष व जिल्हा संघटना सचिव प्रा हरिदास रणदिवे, अकादमीचे मार्गदर्शक प्रा संतोष गवळी, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा सचिन गायकवाड यांनी स्वरीत याचे अभिनंदन केले आहे.