
ठाण्याचा लक्ष्मण गवस व धाराशिवची अश्विनी शिंदे कर्णधारपदी
मुंबई : जगन्नाथ पुरी (ओडिशा) येथे होत असलेल्या ५७ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले असून पुरुष व महिला संघ या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून पुरुष आणि महिला गटातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यानंतर सांगली येथे आयोजित सराव शिबिरानंतर या दोन्ही संघांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी पूर्ण केली. नुकतेच महाराष्ट्र संघ जगन्नाथ पुरी येथे दाखल झाले आहेत.

संघाच्या निरोप प्रसंगी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड गोविंद शर्मा यांच्यासह राज्य असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार आणि सुवर्णमय कामगिरी करेल, असा विश्वास डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे संघ
पुरुष गट : लक्ष्मण गवस (कर्णधार, ठाणे), प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, रूद्र थोपटे, रविकिरण कच्छवा, शुभम थोरात (सर्व पुणे), ऋषिकेश मुर्चावडे, अनिकेत चेदवणकर, निहार दुबळे (मुंबई उपनगर), विजय शिंदे, श्याम ढोबळे (धाराशिव), मिलिंद चावरेकर, अक्षय मासाळ (सांगली), पियुष घोलम (मुंबई), नरेंद्र कातकडे (अहिल्यानगर). प्रशिक्षक : डॉ नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : डॉ पवन पाटील (परभणी), व्यवस्थापक : रमेश लव्हाट (अहिल्यानगर).
महिला संघ : अश्विनी शिंदे (कर्णधार), संपदा मोरे, प्रीती काळे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले (धाराशिव), सानिका चाफे, रितिका मगदूम, प्रगती कर्नाळे (सांगली), प्रियांका इंगळे, दिपाली राठोड, ऋतिका राठोड (पुणे), पायल पवार (रत्नागिरी), मनिषा पडेल (नाशिक), रेश्मा राठोड (ठाणे). प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : अनिल रौंदाळ (नंदुरबार), व्यवस्थापक : संध्या लव्हाट (अहिल्यानगर).