
मुकेशने पटकावले कांस्यपदक
मुंबई ः डेहराडून येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदित्य परब याने स्पर्धेतील बेस्ट ज्युदोका हा पुरस्कार पटकावला. तब्बल २२ वर्षांच्या कालावधीनंतर ज्युनियर गटात महाराष्ट्राच्या ज्युदो खेळाडूला असा सन्मान प्राप्त झाला आहे.

अमरावती प्रबोधिनी येथील खेळाडू अशोक नुरुटी याने २००५ मध्ये हा बहुमान संपादन केला होता. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी महाराष्ट्राच्या खेळाडूला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आदित्य परब याने १०० प्लस किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आणि बेस्ट ज्युदोका हा बहुमान देखील संपादन केला. तसेच मुकेश याने ८१ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आदित्य परब याने आपल्या यशाचा चमकदार प्रारंभ केला आहे. या यशातून प्रेरणा घेत पुढील येणाऱ्या स्पर्धांसाठी आपल्या परिवारातील सर्व जिल्ह्यातील खेळाडूंनी समर्पित आणि सातत्यपूर्ण कष्ट घेत वैयक्तिक कामगिरी उंचवावी आणि आपले पालक, प्रशिक्षक, जिल्हा आणि राज्याला अशा बहुमानाचा अभिमान मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आदित्य परबच्या पुणे येथील प्रशिक्षका रचना धोपेश्वर आणि आताचे साई, गोवा येथील प्रशिक्षक सुशील गायकवाड यांचे आदित्यला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या चमकदार कामगिरीबद्दल मुंबईतील भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी आदित्य परब याचे अभिनंदन केले आहे.