
मुंबई ः बीसीसीआय महिला अंडर २३ एकदिवसीय करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबईच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे वानखेडे स्टेडियमवर भव्य स्वागत करण्यात आले.

मुंबई क्रिकेटसाठी अभिमानास्पद क्षण म्हणून संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याकडे प्रतिष्ठित करंडक सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप, संयुक्त सचिव दीपक पाटील, कोषाध्यक्ष अरमान मल्लिक, कार्यकारी सचिव सी एस नाईक आणि इतर अॅपेक्स कौन्सिल सदस्य मिलिंद नार्वेकर, नीलेश भोसले आणि सुरेंद्र हरमलकर आणि नामांकित आयसीए संगीता कटवारे यांनी संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी, धैर्य आणि टीमवर्कचे कौतुक केले.