
नवी दिल्ली ः बलाना येथे राष्ट्रीय साम्बो बीच चॅम्पियनशिप स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत २०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
विजय इंटरनॅशनल स्कूल (बलाना) येथे राष्ट्रीय साम्बो बीच चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महेंद्रगडचे आमदार कंवर सिंह आणि सरकारी महाविद्यालय महेंद्रगडचे माजी प्राचार्य मेजर मणिराम लांबा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या चॅम्पियनशिपचे उद्घाटन संस्थेचे संरक्षक महेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देशभरातून सुमारे २०० खेळाडूंनी सहभाग घेतला. संघटनेचे अध्यक्ष विजय यादव टूमना यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि सांगितले की, या प्रसंगी दिल्ली, बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांतील खेळाडूंनी भाग घेतला होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नथू सिंग, एनआयएसचे सरचिटणीस साम्बो फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राम शर्मा, सर्व शिक्षक, परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती इत्यादी उपस्थित होते.