गोरेगाव येथे कबड्डीचा महासंग्राम

  • By admin
  • April 1, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

अंकुश मोरे यांच्या एकसष्ठी निमित्त २६ एप्रिलपासून आयोजन

मुंबई : कबड्डी प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! मुंबईत एका भव्य आणि प्रतिष्ठित कबड्डी महाकुंभाचे आयोजन होत आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू व अनुभवी क्रीडा संघटक अंकुश रामचंद्र मोरे यांच्या एकसष्ठी निमित्त ‘महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग-पर्व ३’ आणि सुपर सीनियर राज्यस्तरीय कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ एप्रिल ते ३ मे २०२५ दरम्यान मीनाताई ठाकरे स्मृती क्रीडांगण, गोरेगाव (पूर्व) येथे या कबड्डी महासंग्रामाचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा अभिनव कला क्रीडा अकॅडमी, एकता क्रीडा मंडळ आणि महामुंबई कबड्डी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. विशेष म्हणजे मुंबई उपनगर कबड्डी संघटनेची या स्पर्धेला अधिकृत मान्यता मिळाली आहे.

कबड्डीचा वाढता प्रभाव आणि लोकप्रियता
कबड्डी हा भारताच्या मातीतला खेळ आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. प्रो-कबड्डी लीगमुळे या खेळाला नवे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असून, आज तो तब्बल १५० हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार होत आहे. आशियाई स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेला हा खेळ ऑलिम्पिकमध्ये जावा, अशी सर्व कबड्डीप्रेमींची इच्छा आहे.

“कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. ‘महामुंबई कबड्डी लीग’ हे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांनी सांगितले. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी ९८१९९०४२०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्पर्धेतील वैशिष्ट्ये

  • ४२ संघांचा सहभाग (सीनियर व सब-ज्युनियर गट – मुले व मुली)
  • सुपर सीनियर राज्यस्तरीय कबड्डी लीग (४० ते ५० वयोगट आणि ५०च्या पुढील वयोगट – महिला आणि पुरुष)
  • ‘स्पोर्टबुट’ चॅनलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण
  • सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत थरारक सामने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *