सूर्यकुमार यादवची विक्रमी कामगिरी 

  • By admin
  • April 1, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

टी २० सामन्यात अशी कामगिरी करणारा सूर्या एकमेव भारतीय फलंदाज 

मुंबई ः सूर्यकुमार यादव याने अवघ्या नऊ चेंडूत नाबाद २७ धावांची वादळी खेळी करताना मुंबई इंडियन्स संघाला मोठा विजय मिळवून दिला आणि  वैयक्तिक मोठा विक्रम देखील साजरा केला. अशी कामगिरी करणारा सूर्यकुमार हा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. 

आयपीएलच्या १२ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात गोलंदाज अश्वनी कुमारने शानदार गोलंदाजी केली आणि ४ विकेट घेण्यात यशस्वी झाला. अश्वनी कुमारने त्याच्या पहिल्याच सामन्यात ४ विकेट घेऊन इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात पदार्पणात ४ विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना फक्त ११६ धावा केल्या, त्यानंतर मुंबईने १२.५ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. एकीकडे मुंबईला मोठा विजय मिळाला, तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. सूर्यकुमार यादव टी २० क्रिकेटमध्ये ८००० धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. सूर्या आता विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैनाच्या खास यादीत सामील झाला आहे.

सूर्यकुमार हा जगातील दुसरा सर्वात जलद फलंदाज आणि खेळलेल्या चेंडूंच्या बाबतीत ८००० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला (सूर्यकुमार यादव ८००० टी २० धावा करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज)सूर्यकुमार यादवने ५२५६ चेंडूत ८००० टी २० धावा पूर्ण केल्या. ४७४९ चेंडूत ८००० धावा करणाऱ्या आंद्रे रसेलनंतर हा विक्रम करणारा तो दुसरा सर्वात जलद फलंदाज आहे. सूर्यकुमारने केकेआरविरुद्ध ९ चेंडूत नाबाद २७ धावा करून ही कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेल याने ५२७८ चेंडूत ८००० धावांचा टप्पा पार केला आहे. 

भारतीयांनी सर्वाधिक टी २० धावा
१२९७६ ः विराट कोहली
११८५१ ः रोहित शर्मा
९७९७ ः शिखर धवन
८६५४ ः सुरेश रैना
८००७ ः सूर्यकुमार यादव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *