
गोंदिया ः रॉकेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने माउंट स्कूल सुरतिया, सिरसा (हरियाणा) येथे पहिली ज्युनियर, सीनियर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदक जिंकून प्रथम क्रमांक पटकावला.
सब ज्युनिअर गटात त्रिवेणी वरकडे, चेतन मेहर यांनी प्रथम, रोहित शरणागत याने द्वितीय क्रमांक मिळवला. ज्युनिअर गटात नीलाक्षी हिरापुरे, निखिल पराते यांनी प्रथम तर तेजेश बागडे याने द्वितीय क्रमांक संपादन केला. वरिष्ठ गटात सांची राऊत हिने तिसरे स्थान मिळवले.
सर्व खेळाडूंचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ अरुण कवडे, प्रशिक्षक जसकरसिंग मान, ऋतुराज यादव, मोहित भलावी, ज्वाला तुरकर, श्याम राऊत, हेमंत हुमे, भोजराज रहांगडाले यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ अरुण कवडे यांनी रोख बक्षिसे, क्रीडा साहित्य देण्याची आणि सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयार करण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.