
पंजाब येथे आंतरविद्यापीठ स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः लिमरण टेक्निकल विद्यापीठ पंजाब येथे ५ ते ९ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ रस्सीखेच स्पर्धेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा रस्सीखेच संघ पुरुष व महिला रवाना झाला आहे.
विद्यापीठाच्या पुरुष संघात सुमेध सौंदरमल, सागर काळे, हरिओम घोरड, अमरजीत मरकड, विशाल शिनुरे, कृष्णा उबाळे, सागर इंगळे, विनायक साबळे, ऋषिकेश घुमरे या खेळाडूंचा समावेश आहे. महिला संघात शुभांगी मोरे, भाग्यश्री मतकर, क्रांती मोहिते, साक्षी आंबेकर, कृतिका झालटे, नेहा शेटे, सुवर्णा नवले, साक्षी खामकर, भाग्यश्री पठाडे, गीता वेलणकर या खेळाडूंचा समावेश आहे. या संघा सोबत संघ प्रशिक्षक म्हणून डॉ भागचंद सानप, डॉ शंकर धांडे तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ विनोद पवार व डॉ ज्योती गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या या दोन्ही संघाचे सराव शिबिर बीड येथील केएसके महाविद्यालय येथे संपन्न झाले. या सराव शिबिरातून विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला.या संघाला कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, केएसके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, डॉ संजय पाटील, रस्सीखेच संघटनेचे गोकुळ तांदळे, क्रीडा विभागाचे प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीत सिंग दिक्कत, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन लहिलवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.