
दहा क्रिकेट अकॅडमी संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस
छत्रपती संभाजीनगर : युनिव्हर्सल क्रिकेट अकॅडमी प्रस्तुत सोळा वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा येत्या पाच एप्रिलपासून सुरू होणार आहे, अशी माहिती युनिव्हर्सल क्रिकेट अकॅडमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी दिली.
वाळूज या ठिकाणी ही एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात येत आहे. या स्पर्धेत दहा संघांचा सहभाग असणार आहे. त्यात एमजीएम क्रिकेट अकॅडमी, पाटील क्रिकेट अकॅडमी, युनिव्हर्सल क्रिकेट अकॅडमी, चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी, अपेक्स क्रिकेट अकॅडमी, नेरळकर क्रिकेट अकॅडमी, युनिव्हर्सल ब क्रिकेट अकॅडमी, जाधव क्रिकेट अकॅडमी, सीके क्रिकेट अकॅडमी, जॉन टी क्रिकेट अकॅडमी अशा दहा अकॅडमी संघांचा समावेश आहे.

या दहा मातब्बर अकादमी संघांमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी मोठी चुरस असणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला पन्नास षटकांचे चार लीग मॅचेस खेळायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी 97 66 66 66 43 या क्रमांकावरवर राहुल पाटील यांना संपर्क करावा असे आवाहन युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे करण्यात आले आहे.