
नाशिक ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने फार्मास्युटिकल मेडिसिन क्षेत्रात विविध संशोधन व कौशल्य विकास उपक्रमांकरिता विविध संस्थांसमवेत नुकताच सामंजस्य करार करण्यात आले.
या सामंजस्य करार आदान-प्रदान समांरभास विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, प्रभारी अधिष्ठाता डॉ स्वाती जाधव उपस्थित होते. यावेळी आयसीएमआरच्या संचालिका डॉ गितांजली सचदेव, संशोधक डॉ राहुल गजभिये, एमआयटी ऑफ बायो इंजिनिअरिंगचे प्रा विनायक घैसास, अधिष्ठाता डॉ रेणू व्यास, टॉक्स इंडियाचे संचालक डॉ वसंत नरके, सीईओ देवेन नरके, रॅप अॅनालिटिकल रिसर्चच्या संचालिका हर्षदा पवार व लर्न कोचच्या संचालिका दीपाली तिवारी उपस्थित होत्या.
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, भविष्यात या क्षेत्रात मोठा वाव आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व कौशल्य आदी उपक्रमांना अधिक चालना मिळवण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या सामंजस्य करारांच्या माध्यमातून सिकलसेल, कुष्ठरोग, सर्पदंश या सारख्या संशोधनांवर काम करणे शक्य होणार आहे. अॅनिमल हाऊस, प्रिक्लिनिकल सुविधा व प्रगत उपकरणे यांचा समावेश आहे. नवीन फार्माकॉलॉजिकल तपासण्यासाठी प्राण्यांचे मॉडेल, प्राण्यांचा ट्रान्सजेनिक वापर करुन अधिक सुरक्षित औषध शास्त्र विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यापीठ व करार झालेल्या संस्थांमार्फत विविध शैक्षणिक, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, समर इंटर्नशिप कार्यक्रम यासारखे उपक्रम सर्वच संस्थांमार्फत राबविले जाणार आहे.
आयसीएमआरच्या समवेत झालेल्या कराराअंतर्गत आयसीएमआरच्या वणी येथील केंद्रामार्फत सिकलसेल अॅनिमिया, कुष्ठरोग, सर्पदंश तसेच मुंबई येथील केंद्रामार्फत अॅनिमल हाउस फॅसिलिटी, प्रीक्लिनिकल स्टडिज, अॅडव्हान्स अॅनेलेटीकल इन्स्ट्रूमेंटेशन या विषयांवर संशोधन आणि कौशल्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंग कडून सेल कल्चर, फ्लो सायटोमेट्री, बायोइन्फॉरमॅटिक्स आणि अॅनालेटिकल सुविधा, कौशल्य वाढीसाठी विद्यार्थ्यांची देवाणघेवाण आदी उपक्रम राबविले जाणार आहे.
टॉक्स इंडियाकडून प्रीक्लिनिकल फार्माकोलॉजी अभ्यास, ट्रान्सजेनिक प्राणी अभ्यास, नॉक-आउट माईस, ट्रान्सजेनिक स्टडिज आणि इम्युनोडेफिशिएंट इत्यादी विषयावर उपक्रम राबविण्यात येणार आहे., रॅप अॅनालिटल रिसर्च प्रा लि कडून संशोधन क्षेत्र, प्रगत विश्लेषणात्मक उपकरणे आदी उपक्रम राबविले जाणार आहे.
याप्रसंगी प्रा स्वाती जाधव यांनी या करारांबाबतची माहिती व त्याद्वारे होणारे विविध उपक्रम यांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत शिवगुंडे यांनी केले. डॉ महेंद्र पटाईत यांनी आभार मानले. याप्रसंगी उपकुलसचिव एन व्ही कळसकर, ब्रिगेडियर सुबोध मुळगुंद, डॉ भारती, डॉ प्रदीप आवळे, डॉ गितांजली कार्ले, डॉ स्वप्नील तोरणे, डॉ अनुश्री नेटके, राजेंद्र शहाणे, संदीप राठोड, डॉ श्वेता तेलंग, डॉ सानिया भालेराव, डॉ वैभव आहेर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.