
छत्रपती संभाजीनगर ः भारतीय तलवारबाजी महासंघ व ओडिसा राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या २६व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत चार पदकांची कमाई केली.

मुलांच्या फॉइल वैयक्तिक प्रकारात अर्जुन विजय सोनवणे याने सुवर्णपदक मिळवले तर स्वामिनी उदय डोंगरे हिने फॉइल टीम प्रकारात रौप्य पदक मिळवले तर देवेन पाथ्रीकर व अर्जुन सोनवणे यांनी फॉइल टीम प्रकारात कांस्य पदक संपादन केले. तसेच साई श्रीचंद जाधव, सन्मय संदीप क्षीरसागर, प्रणव पवार, सौम्या साठे यांनी चांगली कामगीरी केली. या संघासमवेत अजय त्रिभुवन, तुषार आहेर यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

या शानदार यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतेज (बंटी) पाटील, साईचे उपसंचालक डॉ मोनिका घुगे, सहसंचालक सुमेध तरोडेकर, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, एस पी जवळकर, गोकुळ तांदळे, डॉ दिनेश वंजारे, सागर मगरे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.