५ व ६ एप्रिल रोजी विद्यापीठ मैदानावर स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभागाच्या मैदानावर राज्य डॉजबॉल ज्युनियर मुले मुली व पुरुष आणि महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ व ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नितीन राठोड, राज्य संघटनेचे महासचिव प्रा एकनाथ साळुंके, देवगिरी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ शेखर शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होईल. या कार्यक्रमाला संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र पवार, गंगा कॉलेजचे संस्थापक राज खंडेलवाल, महासचिव प्रा एकनाथ साळुंके, एम अँड के अकादमीचे क्रिकेट प्रशिक्षक विनोद माने, तसेच या कार्यक्रमाला राज्य संघटनेचे उपाध्यक्ष संगम डंगर, सहसचिव महेंद्र मोटघरे, संतोष खेडे, रमेश शिंदे, रेखा साळुंके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्रातून ३५० खेळाडू व ५० ऑफिशियल उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यकारणी आयोजन समिती सचिव अभिजीत एकनाथ साळुंके, हरी गायके, गणेश बेटुदे, डी आर खैरनार, सागर तांबे, मयुरी गायके, पांडुरंग कदम, बाजीराव भुतेकर यांनी पुढाकार घेतला आहे.