जसप्रीत बुमराह आयपीएल खेळण्याची शक्यता धुसर

  • By admin
  • April 2, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

मुंबई ः भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे सध्या आयपीएल स्पर्धेपासून दूर आहे. एका रिपोर्टनुसार बुमराह तंदुरुस्त झाला असून मुंबई इंडियन्स संघासाठी तो लवकरच खेळेल असे वृत्त होते. परंतु, बुमराह तंदुरुस्त झाल्यानंतरही लगेच खेळू शकणार नाही असे वृत्त आल्याने मुंबई इंडियन्स संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. त्याने या वर्षी जानेवारीमध्ये शेवटचा सामना खेळला. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बुमराह अद्याप मैदानात परतू शकलेला नाही. दरम्यान, एका रिपोर्टनुसार, बुमराह तंदुरुस्त झाला आहे. पण कामाचा ताण लक्षात घेऊन तो आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही.

बुमराहच्या पुनरागमनाबद्दल अजूनही शंका आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार बुमराहला पुनरागमनासाठी जास्त वेळ वाट पहावी लागेल. बुमराह बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे आणि त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. बुमराह क्लिनिकली तंदुरुस्त आहे. पण कामाचे व्यवस्थापन लक्षात घेऊन, तो सध्या मैदानात उतरू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी दरम्यान बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास झाला. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात वेदना होत होत्या.

मुंबईकडून खेळू शकणार नाही

आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी खेळवण्यात आला. मुंबईने आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. बुमराहबद्दल बोलायचे झाले तर, तो अद्याप आयपीएलमध्ये खेळू शकलेला नाही. अहवालानुसार, बीसीसीआयची वैद्यकीय टीम बुमराहला अधिक वेळ देऊ इच्छिते. बुमराह पुन्हा जखमी होण्याचा धोका कमीत कमी करायचा आहे. त्यामुळे परत येणे सध्या शक्य नाही.

मुंबईची खराब सुरुवात
या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईला प्रथम सीएसके आणि नंतर गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. तथापि, तिसऱ्या सामन्यात संघाने शानदार पुनरागमन केले. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा ८ विकेट्सने पराभव केला. मुंबईचा पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आहे. हा सामना ४ एप्रिल रोजी खेळला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *