
नागपूर : लॅम्रीन टेक्स स्किल युनिव्हर्सिटी, पंजाब येथे पाच ते नऊ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रस्सीखेच स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा रस्सीखेच संघ रवाना झाला आहे.
विद्यापीठाच्या महिला रस्सीखेच संघात अंशू बोरकर, आलिया आर्शिया, नीलकशी कुंभारे, सानिया खान, प्राची देवधागळे, पूजा शर्मा, अंशुल बसेशंकर, खुशी बहादुर, पलक माहुरे, ज्ञानेश्वरी घोडमोरे या खेळाडूंचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या पुरुष रस्सीखेच संघात विराज मेहेर, द्वारकेस तडस, करण पेठकर, फराज काझी, फरान मन्सुरी, प्रज्वल सिंदूरकर, मोहम्मद सरफराज अन्सारी, अभिषेक सोनवणे, अमान चौधरी व प्रवीण खरोले या खेळाडूंचा समावेश आहे.
क्रीडा संचालक डॉ विशाखा जोशी, नागपूर जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे सचिव धैर्यशील सुटे, जावेद रहमान, वैभव पांढरे, सुरज सूर्यवंशी, व्यवस्थापक प्रा सौरभ चेटुले, शुभम भोकरे, पियुष भोकरे,अर्पिता जालंदर, विनोद मेश्राम व नरेंद्र चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.