
चाळीसगाव येथे झालेल्या स्पर्धेत जळगाव संघ उपविजेता
चाळीसगाव ः हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा हँडबॉल असोसिएशन व चाळीसगाव तालुका सर्व आजी-माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथील बीपी आर्ट्स, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स आणि के आर कोतकर जुनिअर कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सांगली संघाने विजेतेपद पटकावले आणि जळगाव संघ उपविजेता ठरला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सांगली संघाने जळगाव संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. जळगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामना हा प्रथमतः टाय झाला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत सांगली संघाने हा सामना ४५-४४ असा एका गोल फरकाने जिंकला. पुणे जिल्हा संघाने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
या संपूर्ण स्पर्धेत बेस्ट डिफेंडर ऑफ द टूर्नामेंट निखिल आगोणे (चाळीसगाव), बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट शुभम बच्चे (चाळीसगाव) व बेस्ट गोलकीपर कोल्हापूर जिल्ह्याचा सौरभ माळी यांना जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण कुमार काबाडी, राज्य संघटनेचे सचिव राजाराम राऊत, रुपेश दादा मोरे, मीनल थोरात, अजय देशमुख, मदन परमार, महेशराव मांजरेकर, मुख्याध्यापक बाबा सोनवणे, मुख्याध्यापक प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा खुशाल देशमुख आदी मान्यवर हजर होते
स्पर्धा यशस्वीतेसाठी परेश पवार, योगेश मांडोळे, प्रताप भोसले, सचिन स्वार, प्रफुल शेळके, कुणाल सुर्वे, किरण चौधरी, वरुण देशमुख, भूषण राजपूत, अर्जुन राजपूत, अजित राजपूत, निलेश राजपूत, कल्पेश चौधरी, शुभम भोई, नरेश चौधरी, गौरव गवळी, अमित सोनवणे, कल्पेश लक्ष्मण चौधरी, हर्षवर्धन निकम, प्रथमेश धनगर व चाळीसगाव हँडबॉल खेळाचे सर्व कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेतला होता.
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन योगेश अग्रवाल, सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार, जुनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन नानाभाऊ कुमावत कलंत्री, शाळेचे चेअरमन भोजराजभाऊ पुंशी, क्रीडा समितीचे चेअरमन योगेश भाऊ कंरकाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य व चाळीसगाव सोसायटीचे सहसचिव डॉ मिलिंद बिल्दीकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रवींद्र पाटील यांनी केले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा खुशाल देशमुख यांनी आभार मानले.