वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर

  • By admin
  • April 3, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

बीसीसीआयतर्फे कसोटी, टी २०, वन-डे मालिकांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वरिष्ठ पुरुष भारतीय संघाच्या देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बुधवारी मंडळाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ या वर्षी भारत दौऱ्यावर येतील.

बीसीसीआयने भारतीय संघाचे देशांतर्गत वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिला सामना अहमदाबादमध्ये सकाळी ९.३० वाजता खेळला जाईल तर दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून कोलकातामध्ये सुरू होईल. त्यानंतर वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येईल. या काळात दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाईल.

भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी ः २ ते ६ ऑक्टोबर (अहमदाबाद)

दुसरी कसोटी ः १० ते १४ ऑक्टोबर (कोलकाता)

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी ः १४ ते १८ नोव्हेंबर (नवी दिल्ली)

दुसरी कसोटी : २२ ते २६ नोव्हेंबर (गुवाहाटी)

भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना : ३० नोव्हेंबर (रांची)

दुसरा एकदिवसीय सामना ः ३ डिसेंबर (रायपूर)

तिसरा एकदिवसीय सामना ः ६ डिसेंबर (विशाखापट्टणम)

भारत-दक्षिण आफ्रिका टी २० मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी २० ः ९ डिसेंबर (कटक)

दुसरा टी २० ः ११ डिसेंबर (चंदीगड)

तिसरा टी २० ः १४ डिसेंबर (धर्मशाला)

चौथा टी २० ः १७ डिसेंबर (लखनौ)

पाचवा टी २० ः १९ डिसेंबर (अहमदाबाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *